शेवगावत केंद्रीय पथकाकडून पाहणी

File photo

शेवगाव – केंद्रीय पथकाने दुष्काळीस्थिती पाहणी दौऱ्यात आज तालुक्‍यातील तळणी व बेलगाव येथील खरीप पिकांची धावती पाहणी केली. यावेळी पथकाकडे स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. या पथकातील अधिकारी सुभाषचंद्र मीना, एम.जी टेंभुर्णे, विजय ठाकरे यांनी तळणी येथील विष्णू सातपुते, सारंगधर आनंतपूरी, रामनाथ घनवट तर बेलगाव येथीस अंबादास तनपुरे, रमेश पोकळे या शेतकऱ्यांच्या कपाशी तसेच तूर पिकाची पाहणी केली.

यावेळी काही त्रस्त शेतकऱ्यांनी असहाय्यपणे पथकातील अधिकाऱ्यांचे पाय धरुन शेती व शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, उपविभागीय अधिकारी सुधाकर बोराळे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसिलदार डॉ. विनोद भामरे, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी, पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश वर्पे, कृषी पर्यवेक्षक सचिन कुसळकर, कृषी सहाय्यक बाळकृष्ण विघ्ने, अनंतर रणमले उपस्थित होते.

पाहणी पथक खानापूर, तळणी, शेवगाव, राक्षी, चापडगाव, बेलगाव, आंतरवली खुर्द शे येथे पाहणी करुन ते नंतर पाथर्डीला रवाना झाले. फारसा गाजावाजा न करता अचानक आलेल्या वाहनांच्या मोठ्या लव्याजम्यामुळे प्रत्येक ठिकाणी मोठी धांदल उडाल्याचे दिसत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)