जनावरांच्या चाऱ्यासह पाण्याची व्यवस्था करावी – अॅड. काकडे

file photo

शेवगाव – दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना आठ दिवसांच्या आत दावणीला चारा व पाणी देण्याची व्यवस्था शासनाने करावी अन्यथा, जनशक्ती विकास आघाडीतर्फे आंदोलन करून शासकीय अधिकाऱ्यांना गावबंदी करण्यात येईल, असा इशारा अॅड. शिवाजीराव काकडे यांनी दिला.

दुष्काळाच्या उपाययोजना त्वरित कराव्यात, या मागणीसाठी तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी संजय आंधळे, वैभव पुरनाळे, अॅड.संजय काकडे, तानाजी बोडखे, पंडितराव नेमाने, अॅड. अण्णासाहेब मराठे, शंकर भालसिंग, ज्ञानदेव कातकडे आदी उपस्थित होते.

-Ads-

अॅड. काकडे म्हणाले, तालुक्‍यातील बहुसंख्य शेतकरी दूध धंद्यावर अवलंबून आहेत. चारा व पाणी नसल्याने जनावरांचे कुपोषण होत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत दुष्काळाला तोंड देण्यासाठी सर्व दुष्काळी योजनांची अंमलबजावणी करावी व जनावरांना दावणीला चारा व पाणी द्यावे. अन्यथा शेतकऱ्यांचा महामोर्चा काढला जाईल. यावेळी हर्षदा काकडे, जगन्नाथ गावडे, नामदेव कसाळ, संजय आंधळे, भाऊसाहेब पोटभरे यांची भाषणे झाली. नायब तहसीलदार माधव गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)