लेखी आश्‍वासनानंतर राजेभोसले कुटुंबियांचे उपोषण मागे

शेवगाव – तालुक्‍यातील मुंगी येथील राजेभोसले कुटूंबियांनी मुंगीच्या सहकारी सेवा संस्थेच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी सुरु केलेले उपोषण आज पाचव्या दिवशी सायंकाळी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक श्रीमती काटुळे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर लिंबूपाणी घेवून सोडले. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची तात्काळ चौकशी करुन त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास दि. 4 डिसेंबर पर्यंत सादर केला जाईल असे लेखी आश्‍वासन देण्यात आले.

मुंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमधून बोगस ऊस कर्ज वाटप करण्यात आले, बाहेरगावी कामधंदयाच्या निमीत्ताने गेलेल्या सभासदाच्या नावे कर्ज उचलण्यात आले, टॅंक्‍टर, पाईपलाईन, ऊस कर्ज, दिर्घ व मध्यम मुदतीचे कर्ज उचलून तारण दिलेल्या जमिनी अनेकांनी परस्पर विकल्या, सचिवाने केलेल्या अशा अनेक गैरप्रकाराबाबत त्याला पाठीशी घालणाऱ्यांचीही चौकशी व्हावी, या मागणीसाठी बुधवार दि. 21 पासून धनंजय दिलीप राजेभोसले, उमाजी बळवंत राजेभोसले व संभाजी राजेभोसले हे तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषणास बसले होते. तालुका विकास अधिकारी व नायब तहसिलदारांनी उपोषणास बसलेल्यांशी चर्चा केली होती मात्र ते उपोषणावर ठाम होते.

आज सहकारी संस्थेचे सहायक निबंधकांच्या वतीने जी. एस. विखे, तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब चेके, कार्यालयीन अधिक्षक व्ही.डी. कोठुळे, ए.सी भुसारी, तहसील कार्यालयाचे गणेश हुलमुखे व संतोष गर्जे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करुन लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मात्र दि.4 डिसेंबरपर्यंत कार्यवाही न झाल्यास पुन्हा उपोषण करण्यात येईल असा इशारा उमाजी राजेभोसले यांनी यावेळी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)