दरोडेखोरांनी शेवगावमधील एकास तलवारीने भोसकले

तालुक्‍यातील मुरमी येथील घटना

शेवगाव/ बोधेगाव – मुरमी (ता. शेवगाव) येथे आज ( दि.10) पहाटे 2 ते 3 च्या सुमारास आठ सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. यावेळी दरोडेखोरांनी लहानू गाडीवान (वय 60) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी आशाबाई लहानू गाडीवान यांचे अंगावरील 54 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 50 हजार रुपये रोख असा एकूण एक लाख 4 हजार रुपये किंमतीचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला. यासंदर्भात आशाबाईंनी शेवगाव पोलीस ठाण्यात दरोडयाची तक्रार दाखल केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मध्यरात्री 2 चे सुमारास शहादेव मोहन शिंदे यांचे वस्तीवर दरोडेखोर प्रथम चालून गेले. मात्र घरातील लोक जागे झाल्याने त्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. शिंदे यांनी परिसरातील सर्व वस्तीवरील लोकांना फोन करून जागे केले. मात्र गाडीवान यांचा मोबाईल बंद होता. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या लहानू सीताराम गाडीवान यांच्या वस्तीकडे दरोडेखोरांनी आपला मोर्चा वळवला.

लहानू गाडीवाम घराच्या बाहेर घराच्या झोपले होते. चोरट्यांनी गाडीवान यांच्या घरात प्रवेश करत उचकापाचक सुरु केली असता गाडीवान जागे झाले, त्यांना चार जणांनी मारहाण केली. गाडीवान यांच्या पत्नी आशाबाई व मुलगा राम, पत्नी ज्योतीसह वेगवेगळ्या खोल्यात झोपलेले होते. दरोडेखोरांनी रामच्या खोलीला बाहेरुन कडी लावली व लहानूला पैसे कुठे ठेवले ते सांग असे म्हणत मारहाण करत असतांना त्यांनी विरोध केला तेव्हा एकाने चाकूने त्यांच्या पोटावर दोन- तीन वार केल्याने ते खाली पडले.

पैसे पेटीत असल्याचे सांगितल्यावरुन चोरांनी घरातील पेटया बाहेर शेतात नेल्या. काही चोरांनी आशाबाईच्या अंगावरील दोन सोन्याच्या पोती, कानातील झुबे व हातातील अंगठी असे सोन्याचे दागिने ओरबडून घेतले. दरम्यान मुलगा राम यांनी शेजारील वस्त्यावरील लोकांना मोबाईलवर चोर आल्याची माहिती दिली. तेव्हा लोक गाडीवान यांच्या वस्तीकडे धावले. त्याचा सुगावा लागल्याने चोरांनी वस्तीच्या मागील बाजूने पलायन केले. काहींनी शेवगाव व बोधेगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता पोलीस तत्काळ तेथे पोहचले.

पोलीस व नागरीकांनी जखमी गाडीवान यांना लगेच बोधेगावला प्राथमिक उपचार करुन शेवगावच्या ग्रामिण रुग्णालयात नेले. तेथून त्यांना अधिक उपचारासाठी नगरला पाठवण्यात आले. आज सकाळी पोलीस अधिक्षक डॉ .रंजकुमार शर्मा, पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन तपास कामी सुचना केल्या. यावेळी श्वान पथकही बोलाविण्यात आले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)