अंगणवाडीमध्ये होणार संस्कार महत्वाचे

शेवगाव – एखाद्या भव्य वास्तूसाठी त्याचा पाया मजबूत हवा असतो, त्याप्रमाणे उच्च शिक्षणासाठी बालपणी अंगणवाडीमध्ये होणारे शिक्षण व संस्कार महत्त्वाचे असतात ते घडविण्याचे कसब अंगणवाडी सेविकांमध्ये हवे असते, ते कसब येथील रेणुका जगदाळे यांच्यात आहे. त्यांच्यामुळे येथील लहान मुले सुधारली, आई-वडील अडाणी असतानाही त्यांना शिक्षणाची गोडी लागली.

जिल्हा परिषदेने त्यांचा आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून केलेला गौरव सार्थ आहे. या पुरस्काराने त्यांना त्यांच्या कार्याची पावतीच मिळाली आहे. अशा शब्दात माजी सरपंच काकासाहेब काळे यांनी रेणुकाताईचा गौरव केला.

-Ads-

तालुक्‍यातील विजयपुरच्या अंगणवाडी सेविका रेणुका राम जगदाळे यांना नुकतेच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे हस्ते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती अनुराधा नागवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने,उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, शेवगावच्या प्रकल्प अधिकारी संगीता पालवे आदिंच्या उपस्थितीत आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानिमित्त विजयपूरमध्ये आयोजित सत्कार सोहळ्यात काळे बोलत होते. यावेळी श्रीमंत जगदाळे विद्या काळे, ज्योती वाघमारे, चंद्रभान बेडके यांची भाषणे झाली. पर्यवेक्षिका रेणुका नागरे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)