शिक्षकांनी व्यसनमुक्‍त असावे : पुरुषोत्तम कराड

संग्रहित फोटो

शेवगाव – वेळ कुणासाठीही थांबत नाही. तिचा सदुपयोग झाला पाहिजे. तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहायला हवे, व्यसनामुळे विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी मागे लागतात. कॅन्सरसारखे दुर्धर आजार जडतात. शिक्षक स्वतः व्यसनमुक्त असावेत, म्हणजे त्यांनी दिलेली व्यसन मुक्तीची शपथ चांगला संदेश देऊ शकेल,असे मत पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी येथे व्यक्‍त केले.

तालुक्‍यातील ढोरजळगाव येथील श्रीराम माध्य विद्यालयात आयोजित व्यसनमुक्‍ती ही काळाची गरज या विषयावर व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना कराड बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य विक्रम ऊकिडे होते. यावेळी माजी सरपंच व भाजप युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश कराड, विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत आहेर, रामनाथ कराड आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कराड म्हणाले, आपण शरीराला पोषक घटक देण्याऐवजी चरस, गांजा, दारू, गुटखा, तंबाखू आशी व्यसने लावतो. त्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती नाहीशी होते. व्यसनातील खर्च चांगल्या कामासाठी केला तर त्याचे फलीतही चांगले मिळते. आपण भविष्यात कोणाचा आदर्श घेऊन वाटचाल करावी ते प्रत्येकाने स्वतः ठरवणे महत्वाचे आहे. दगडाला घडविले तर मुर्ती बनते आपण तर मनुष्य जन्माला आलो.

आपण स्वतःला घडवु शकत नाहीत का असा प्रश्न करून सध्या शालेय जीवनात कॉपीचे प्रमाण वाढले आहे. कॉपी करणे म्हणजे ज्ञान मंदिरात चोरी करणे चांगले आचार विचार संस्कृतीचा अंगीकार करा.ती निश्‍चित भविष्यात प्रेरक ठरल्याशिवाय राहणार नाही. सुत्रसंचालन संजय दुधाडे यांनी केले.परशुराम नेहूल यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)