शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमित करा

नगर - शेवगाव येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमित करण्यासंदर्भात निवेदन पालकमंत्र्यांना देताना जि.प. उपाध्यक्ष घुले.

नगर – शेवगाव शहरासह तालुक्‍यातील सरकारी जागेवर वर्षानुवर्षे राहणाऱ्या भूमिहीन लोकांची अतिक्रमणे नियमित करण्याबरोबरच शहरासाठी महाराष्ट्र स्वर्णजयंती नगरोत्थानंतर्गत 80 कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेची 10 टक्‍के स्वनिधींची रक्कम शासनाने भरावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे केली.

शेवगाव शहरासाठी प्रस्तावित असलेली 80 कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेच्या 10 टक्‍के रक्कम म्हणजे 8 कोटी रुपये नगरपरिषदेने भरावयाची आहे, शासनाने अनेक पाणीयोजना शासकीय निधीतून पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे 8 कोटी रुपये भुर्दंड नगरपरिषदेला न देता शासकीय निधीतूनच योजना पूर्ण करण्याची मागणी घुले यांनी ना. शिंदे यांच्या बरोबर चर्चा करताना केली. ना.शिंदे यांनी ही मागणी त्वतः मान्य करत यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्‍वासन दिले.

तसेच शेवगाव शहरासह तालुक्‍यात अनेक प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थीना स्वतः जागा नसल्याने तसेच ते अनेक वर्षांपासून झोपडपट्टी, शासकीय जागेवर राहत आहेत. जागेचा सात बारा उतारा, सिटीसर्व्हेची अट शिथिल करून 4 एप्रिल 2002 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार सरकारी जागेवरील लाभार्थ्यांना मालकी हक्काचे उतारे देण्याचे आदेश आहेत. त्यानुसार अतिक्रमणे नियमीत करावेत, अशी मागणी घुले यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक सागर फडके, अजिंक्‍य लांडे, नगरसेवक विकास फलके, कृष्णा ढोरकुले, कैलास तिजोरे, साईनाथ आधाट, भाऊसाहेब लिंगे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)