बोंडअळी अनुदानाचा तिसरा टप्पा मिळणार?

File photo

शेवगाव, दि. 3 (प्रतिनिधी)- तालुक्‍यातील बोंडअळीबाधित शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातील 5 कोटी 15 लाख 27 हजार रुपये अनुदान दीपावलीपूर्वी संबंधितांच्या खात्यावर जमा होणार आहे. 8 हजार 127 शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
गतवर्षी बोंडअळीने बाधीत झालेल्या कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले होते. राज्य शासनाने त्याची दखल घेऊन त्यासाठी अनुदान मंजूर केले.

तालुक्‍यासाठी मंजूर झालेल्या 41 कोटींपैकी पहिल्या टप्यात 8 कोटी 75 लाखापैकी 53 गावातील 16 हजार 353 शेतकऱ्यांना 8 कोटी 74 लाख 87 हजार 836 रुपये तर दुसऱ्या टप्यात आलेल्या 13 कोटी 12 लाखापैकी 52 गावातील 22 हजार 31 शेतकऱ्यांना 13 कोटी 12 लाख 11 हजार रुपयांचे अनुदान पुर्वीच देण्यात आले.

यातून 16 गावे वंचीत राहिली होती, त्यांना तिसऱ्या टप्यातील 6 कोटी 75 लाख रुपये अनुदान प्राप्त झाले असून, यात वंचीत असलेल्या शोभानगर, राणेगाव, सेवानगर, गोळेगाव, कोनोशी, शेकटे खु, शिंगोरी, हातगाव, एंरडगाव, अधोडी, जोहरापूर, गा.जळगाव, नागलवाडी, कांबी, खामगाव, हिंगनगाव येथील शेतकऱ्यासह 35 गावात राहिलेल्या अशा 8 हजार 127 शेतकऱ्यांना 7 हजार 561 बाधीत क्षेत्रासाठी 5 कोटी 15 लाख 27 हजार 698 रुपये अनुदान धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे.

या शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी तहसील कर्मचाऱ्यांने रात्रभर जागरण करून ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्याच्याप्रमाणेच बॅंकेनेही सहकार्य करावे अशी अपेक्षा लाभार्थी व्यक्त करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)