शेवगाव – तालुक्‍यातील हसनापूर येथील दारूबंदीसाठी महिलांनी चंग बांधला आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना निवेदन देऊन गावाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी जातीने लक्ष घालण्याची गळ घातली.

हसनापूर येथे अनधिकृत दारू व्यवसाय वाढला आहे. नागरिक दारूच्या आहारी गेले आहेत. एवढेच नव्हे, तर कोळगाव, मंगरूळ बु, मंगरुळ खु, ठाकुर निमगाव, वरखेड, सोनेसागंवी, वाडगाव येथील व्यसनी व्यक्ती दारूसाठी याच ठिकाणी येतात. त्यामुळे गावात तंटे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा शालेय विद्यार्थी व महिलांवर विपरीत परिणाम होत आहे.

तरुण पिढी व्यसनाच्या आहारी चालली आहे. गावातील शांतता बिघडली आहे. भेसळयुक्त दारूने आरोग्यास धोका होण्याची शक्‍यता आहे. याबाबत वेळीच दखल घेऊन येथील अनधिकृत दारू धंदे बंद करावेत, अशी मागणी कलावती ढाकणे, मनीषा ढाकणे, रंजना तुजारे, मालन तुजारे, रंभाबाई धायगुडे, सुवर्णा तुजारे, कल्पना तुजारे, सीता ढाकणे, शालुबाई तुजारे आदींनी ढिकले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)