आ. राजळे यांनी श्रेय लाटू नये

मीरा आल्हाट : काकडे यांनीच योजना मंजूर केल्याचा दावा

शेवगाव – वडुले खुर्द, वाघोली, निंबे व नांदूरविहिरे या चार गावांसाठी स्वतंत्र पाणीयोजना मंजूर व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्य हर्षदा काकडे यांनी वेळोवेळी आंदोलने केल्याने त्यांना आता मंजुरी मिळवली. त्या काळात मोनिका राजळे या आमदारही नव्हत्या. त्यामुळे त्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये, अशी टीका वाघोलीच्या माजी सरपंच मीरा आल्हाट यांनी केली आहे.

वडुले, वाघोली, निंबे व नांदूर विहिरे या गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राष्ट्रीय पेयजल योजनेतून मंजूर झाल्याचे वृत्तपत्रांतून वाचले. वास्तविक काकडे यांच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये या चारही गावातील ग्रामपंचायतींचा ठराव व निवेदन जीवन प्राधिकरणाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. बी. सागू यांना देऊन घेराव आंदोलन केले होते.

त्यामध्ये सुधाकर आल्हाट, प्रल्हाद बुधवंत, राजेंद्र बुधवंत, चंद्रकांत पुंडे, रमेश भालसिंग, कानिफ वांढेकर, पांडुरंग कळकुटे, अमोल वाघ, हरिभाऊ शेळके, दशरथ घोरपडे, अशोक आव्हाड, दिलीप आव्हाड, म्हातारदेव आव्हाड, धर्मनाथ आव्हाड आदी ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता, असे नमूद करून त्या म्हणाल्या, की जिल्हा परिषदेत ठराव मांडून तत्कालीन मुख्यमंत्री, पाणीपुरवठामंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे काकडे यानी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

त्यानंतर, योजनेची व्यवहार्यता तपासणी करण्याचे व मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश केल्याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी रा. अ. साबणे यांनी 26 जानेवारी 2016 रोजी काढले होते. त्यानुसार अमंलबजावणीसाठी चारही गावांत पाहणी करण्यात आली; परंतु निधीअभावी ही योजना रखडली होती.

आता मुख्यमंत्री पेयजल योजनेऐवजी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत या योजनेसाठी निधी मंजूर झालेला आहे. या योजनेचे खरे श्रेय काकडे यांचेच आहे. त्यासंदर्भातील सर्व पुरावे आपणाकडे आहेत. आमदार राजळे या न केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत. दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका आल्हाट यांनी केली आहे.

“विधानसभेत जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी न केलेल्या विकासकामांचे श्रेय घेऊ नये. एखाद्या कामाच्या यशाबाबतची शहानिशा करूनच त्याची प्रसिद्धी करावी. रेंगाळलेल्या ताजनापूर जलसिंचन टप्पा क्रमांक दोन या योजनेसाठी निधी आणून काम पूर्ण करावे. तसे केले, तर त्यांचा जनतेच्या वतीने जाहीर सत्कार करू. ”
-हर्षदा काकडे ,जिल्हा परिषद सदस्य, नगर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)