गणरायाचे उत्साहात आगमन

शेवगाव – गणपती बापा मोरया, एक, दोन, तीन, चार, गणपतीचा जयजयकारच्या जयघोषात शेवगावमध्ये दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. मोहरम व गणेशोत्सव यंदा एकाच कालावधीमध्ये आल्याने तसेच सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या धोरणामुळे सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेशोत्सवाला अडचणी निर्माण झाल्या. त्याचा परिणाम गणेशमुर्ती विक्रीवर झाल्या असून 50 टक्‍के मुर्त्यांची विक्री झाली.

सायंकाळपर्यंत शहरात 31 तर तालुक्‍यात 103 गणेश मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. यंदा एक गाव एक गणपतीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या वर्षी 20 गावात एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यंदा मात्र आतापर्यंत राणेगाव येथे एकमेव गावात एक गाव एक गणपती बसविल्याची नोंदणी झाली.
यावर्षी नगरपरिषदेने ना हरकत दाखला देण्यासाठी नागरीकांचा रोष घेवून शुल्क आकारणी केली. मंडळाला सोयीस्कर व्हावे, म्हणून विभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलीस ठाण्यातच एक खिडकी योजना राबवून तेथे नगरपरिषदेचे ना हरकत दाखला देण्याची व्यवस्था केली होती. त्यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याने 20 पैसे चौरस फुटाप्रमाणे मंडळाच्या जागेची आकारणी लावून ना हरकत दाखले दिले.

गणेश प्रतिष्ठपणे संदर्भात येथे काही महत्वाची नियमावलीही करण्यात आली असून जे गणपती विनापरवाना बसविलेले आढळतील. त्यांना उद्या नोटीसा बसवण्यात येणार आहेत. तरीही लगेच नोंदणी केली गेली नाही तर मंडळाविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. प्रतिष्ठापना झालेल्या 20 मंडळाच्या मांडवात पाच जणांची समिती थांबणार आहे. तसेच यावेळी डिजेला शंभर टक्‍के बंदी असून त्याचे उल्लघंन केल्यास ध्वनीमापक यंत्रावर मोजदाद व चित्रीकरण करुन त्यानुसार संबंधितावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखली जावी. महिला मुलींची छेडछाड होवू नये, यासाठी पोलीस उपनिरीक्षक भारत काळे यांच्या नेतृत्वाखाली दामिनी पथकाचे गठण करण्यात आले आहे.

शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील गणेश मंडळांवर त्यांचे विशेष लक्ष आहे.तेथे रोडरोमिओंनी गैरवर्तन केल्यास त्यांना ताब्यात घेवून कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.या आठवडयात या पथकाने 26 टारगटांना ताब्यात घेवून त्यांच्या पालकासह त्यांची लेखी घेवून त्यांना समज देण्यात आली आहे. गणेश मंडळ परिसरावर विशेष नजर ठेवण्यासाठी शहरात 15 सी.सी.टि.व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मिरवणुकीच्या रस्त्यावरील खासगी व्यवसायिकांचेही त्यासाठी सहकार्य घेण्यात आले आहे. त्यांच्या कॅमेऱ्यांची दिशा या काळात बदलून घेण्यात आली आहे.

शेवगाव शहराला गणेश उत्सवाची दिर्घ परंपरा असून येथे शंभरी पार केलेली अनेक गणेश मंडळे आहेत.येथील मानाच्या पहिल्या लाटे गणपतीचे हे 123 वे वर्ष आहे. त्याची स्थापना 1895 मध्ये झाली आहे. भोईराज मंडळाची स्थापना 1912 मध्ये माळीवाडा (हललीचे शिवशक्ती), गणेश मंडळ 1922 मध्ये तर खालची वेस गणेश मंडळ 1923 मध्ये स्थापन झाली असून टिळक मंडळ, बालाजी मंडळ, नेता सुभाष मंडळ अशी काही मंडळे शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)