शेवगावच्या न्यू आर्टस्‌ महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन 

शेवगाव – येथील न्यू आर्टस्‌ महाविद्यालयात जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त ग्रंथालय विभाग आणि अजब प्रकाशन कोल्हापूर यांच्यातर्फे ग्रंथप्रदर्शन आणि ग्रंथ सारांश लेखनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या याप्रसंगी काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य भानुदास नामदेव भिसे यांनी उद्‌घाटन केले. या वेळी प्राचार्य डॉ. एल. एस. मतकर, उपप्राचार्य डॉ. आर. के. कासार, प्रा. सुधाकर कुऱ्हाडे, सुसे, प्रा. मोहन वेताळ, प्रा. नारायण गोरे, प्रा. सुभाष कडलग, प्रा. श्रद्धा नवल, ऋषाली पाटेकर, प्रा. किशोर, प्रा. खरड आदी उपस्थित होते. प्रा. मीनाक्षी चक्रे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सीमा आहेर, डॉ. अनिता आढाव यांनी केले. प्रा. शीतल हिवाळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)