बोधेगावात एकास जीवे मारण्याचा प्रयत्न

शेवगाव  – पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून एकास गुप्तीने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बोधेगाव (ता. शेवगाव) येथे सोमवारी (दि.27) घडली. शेवगाव पोलिसांनी एकाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला शनिवारपर्यंत (दि.1) पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्‍यातील बोधेगाव येथील कुढेकर वस्तीत बबन किसन भवार, वय 38 रा. कुढेकरवस्ती, बोधेगाव याने पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन सोमवारी (दि.27)रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सुनील रामा कुढेकर, वय 30 याच्या पोटात गुप्ती भोसकून त्याचा कोथळा बाहेर काढला. तसेच त्याच्या बरगडी, तोंडावर वार करून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना त्यांच्या वस्तीत सामरे गुरुजींच्या शेतात घडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जखमी सुनील कुढेकर याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर नगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्ञानदेव कुढेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी बबन भवार या आरोपीस अटक केली आहे. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत (दि.1) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. ई. मातोंडकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)