पोलीस ठाण्यावर शिवसेना कार्यकर्त्यांचा मोर्चा

आरोपीस त्वरित अटक न केल्यास आंदोलन

शेवगाव – तालुक्‍यातील पिंगेवाडी येथील नितीन निकाळजे या तरुणाचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली गुदमरून दि. 3 जुलै रोजी मृत्यू झाला. त्यास वाळू भरण्यासाठी प्रवृत्त करणारा आरोपी सिद्धीक शामक शेख यास शेवगाव पोलीसांनी त्वरीत अटक करावी या मागणीसाठी आज पोलीस ठाण्यावर तालुका शिवसेना कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.

यावेळी पोलीस आरोपीला पाठिशी का घालत आहेत? तीन महिन्यानंतरही आरोपीस अटक होत नाही. तालुक्‍यातील कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे ढासळलेली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. आठ दिवसात आरोपी जेरबंद न केल्यास शेवगाव तालुका बंदसह विविध ठिकाणी रास्ता रोको करू आणि याची जबाबदारी पूर्ण प्रशासनाची असेल, असे खडेबोल उपस्थित कार्यकर्त्यांनी सुनावले.

यावेळी पिंगेवडी ग्रामस्थांसह शिवसेनेचे कार्यकर्ते ऍड. अविनाश मगरे, तालुका युवा सेनेच्या शितल पुरनाळे, प्रकाश वाघमारे, संजय नागरे, सुनील जगताप, बाळासाहेब जमधडे, संजय नागरे, संजय लहासे, संगीता निकाळजे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)