कोपरगाव -कोपरगाव तालुक्‍यात ऊसावर हुमणी किडीचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात दिसुन आला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा संभव आहे. त्यासाठी वेळीच हुमणी किडीचे नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी केले आहे.

मागील वर्षी पर्जन्यमान चांगल्या प्रमाणात झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. आता या ऊस लागवडीवर हुमणी किडीचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. या किडीचे वेळीच नियंत्रण शेतकऱ्यांनी केले पाहिजे. अन्यथा त्यातून त्यांचे 70 ते 100 टक्के नुकसान होवु शकते.

यासाठी कारखान्याच्या ऊस विकास विभागात तसेच कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन मार्गदर्शन घ्यावे व हुमणी किडीचे वेळीच नियंत्रण करावे असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)