भुतकर कुटुंबीयांचा आत्मदहनाचा प्रयत्न

नगर : भुतकर कुटुंबीयांना आत्मदहनापासून रोखताना पोलीस कर्मचारी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीसांनी घेतले ताब्यात

नगर  – शनिशिंगणापूर येथील बहुचर्चीत गणेश भुतकर हत्या प्रकरणातील आरोपी गेल्या आठ महिन्यापासून राजरोसपणे फिरत असतानाही त्यांना अटक होत नसल्याच्या निषेधार्थ मयत गणेशची पत्नी अनिता भुतकर व भाऊ रामेश्‍वर, ज्ञानेश्‍वर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

पोलिसांनी वेळीच धाव घेत भुतकर कुटुंबीयांना ताब्यात घेवून पोलीस अधिक्षक कार्यालयाकडे पाठवले. 20 डिसेंबर 2017 रोजी गणेश भुतकर यांची आरोपी आविनाश बानकर याच्या साथीदारांनी धारदार शस्त्राने हत्या केली होती. याप्रकरणी आविनाश बनकरचा भाऊ पंकज बनकर, मयुर हरकळ, अर्जून हाले, लखन ढगे, भाऊराव ढाले या आरोपींना अटक केली आहे.

यातील मुख्य आरोपी अविनाश बानकर व गणेश सोनवणे आठ महिन्यांपासून फरार आहेत. यातील अविनाश बानकर याच्या फेसबुकवरील फोटोवरुन तो नगरमध्ये असल्याचे स्पष्ट होत आहे. तरी त्यास अटक केली जात नाही. तपास चालु असल्याचे पोलीसांकडून वारंवार सांगितले जात आहे. असा आरोप मयत गणेशची पत्नी अनिता भुतकर हिने केला आहे. तसेच पोलीस व आरोपी यांच्यात लागेबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)