माजी विद्यार्थ्यांचा जुन्या आठवणींना उजाळा

कर्जत – तालुक्‍यातील माहीजळगाव येथील विठ्ठल विद्यालयात दहावीतील विद्यार्थ्यांनी तब्बल 21 वर्षांनंतर एकत्र येत, जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यालयाचे प्राचार्य एस. पठाण यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक अंबादास शिंगटे, भरत तोडमल, अशोक गायकवाड, सुग्रीव कोपनर आदी होते. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला वॉटर फिल्टर भेट दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर कोपनर यांनी केले. या कार्यक्रमात विद्यालयातील दिवंगत शिक्षक गिरजाबापू ढोबे आदिंना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

-Ads-

जयराम साबळे यांनी त्यांच्या सोबतच्या जुन्या आठवणी जागवल्या. यावेळी सचिन माळी, निळकंठ ससाणे, सचिन निंभोरे, सुखदेव कारंडे, सचिन मेंगडे, उमेश जाधव, हनुमान शिंदे, डॉ. कृष्णा डाडर, हरिओम वधवा यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. अंबादास शिंगटे व भरत तोरडमल यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आभार मानले. सचिन निंभोरे यांनी सूत्रसंचालन तर, अंगद डाडर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)