गुरुदत्त विद्यालयाला पुस्तकांचे वाटप

गोपाळपूर – नेवासे तालुक्‍यातील शिरसगाव येथील स्व. सखाराम बाळा आगळे सेवाभावी संस्थेच्या वतीने देवगड येथील गुरूदत्त माध्यमिक विद्यालयातील मुलांना स्पर्धा परीक्षा व धार्मिक पुस्तकांचे वाटप देवगड संस्थांचे मठाधिपती भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत नांगरे, संस्थेचे अध्यक्ष रविंद्र आगळे, विश्वस्त डॉ. अदिनाथ आगळे, दीपक आगळे, विठ्ठल शेळके, डॉ. श्रीराम मोरे, किशोर नावंदर, संजय फिरोदिया, शिक्षक गणेश लंघे, संतोष काळे, रंगनाथ रिंधे, गणेश आरगडे, दीपक वायकर, राजेंद्र थोरात, भाऊसाहेब वाणी, दादासाहेब नाबदे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या संस्थेच्या माध्यमातून प्रसाद सार्वजनिक वाचनालय मक्तापूर, विठ्ठल सार्वजनिक वाचनालय वरखेड, कै.वकिलराव लंघे सार्वजनिक वाचनालय शिरसगांव, रमेशभाई सार्वजनिक वाचनालय रांजणगाव, सरस्वती सार्वजनिक वाचनालय गिडेगाव, तुळजाभवानी सार्वजनिक वाचनालय खामगाव व जिल्हा परिषद शाळेला देखील पुस्तके दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)