वळण आश्रमशाळेत संविधान दिन साजरा

राहुरी  – वळण येथील श्री गाडगे महाराज आश्रम शाळेत भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे पुजन करण्यात आली.

प्रास्तविकात सुरेश पवार यांनी संविधान दिन व मुंबई शहिद या विषयी विवेचन केले, या प्रसंगी मुख्याध्यापक मंगेश पगारे यांनी भारतीय संविधानातील 395 कलमे, परिशिष्ट, वंचित घटक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांविषयी माहिती दिली.
यावेळी मुख्याध्यापक कैलास दांडगे यांनी भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी सर्व विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेत्तर वृंदांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केले व शेवटी मुंबई हल्यातील शहिदांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)