वाळूंज येथील नालंदा स्कूलची सायकल सफर

मुख्याध्यापक पल्लवी बहादुरगे : विद्यार्थ्यांनी 45 किमी चालवली सायकल

नगर – आजच्या दैनंदिन जीवनात सायकल इतिहासात जमा झाली आहे. मानवी जीवनात सायकलचे महत्त्व खूप कमी झाले आहे. वैज्ञानिक युगात वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या व आधुनिक प्रवासाची साधने याकडे मानव पूर्णपणे आकर्षित झाला आहे. रोजच्या धावपळीच्या व व्यस्त जीवनामध्ये आपल्याला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सायकल या सर्व गोष्टीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. गाडी वापरण्याऐवजी सायकल वापरणे खूपच फायदेशीर आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हायला हवी. त्यासाठी नालंदा स्कूलच्या विद्यार्थ्यांची सायकल सफर काढण्यात आल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पल्लवी बहादुरगे यांनी दिली.

दरेवाडी, नारायण डोह, सारोळा या मार्गे चांदबीबी महालापर्यंत सुमारे 45 किलोमीटर अंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सायकल चालविण्याचा अनुभव घेतला. आजच्या तरुण पिढीला गाडीचे व्यसन जडले आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आळशीपणा जास्त प्रमाणात वाढला आहे व काम करण्याची क्षमता कमी झाली आहे. वाढलेल्या रहदारीमुळे पालकवर्गही मुलांना बाहेर सायकल घेऊन आल्यास मनाई करतात. त्यामुळे मुलांना देखील सायकलचा आनंद मनसोक्त घेता येत नाही.

वाळुंज येथील नालंदा शाळेतील विद्यार्थ्यांनी रहदारीच्या मार्गाने न जाता गावातील रस्त्यांवरून जाण्याचा अनुभव घेवून वाळुंज ते चांदबीबी महाल 45 कि.मी. अंतर पार करून इतर शाळेसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जास्तीत जास्त मुलांनी सायकल वापरून आपले आरोग्य निरोगी राखावे, असा संदेश या सायकल सफरीतून देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)