शहरटाकळी विद्यालयात स्व. काकडे यांना अभिवादन

भावीनिमगाव – आपल्या वकीली पेशातून समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचे काम करीत असताना, शैक्षणिक संस्था माध्यमातून कॉ. आबासाहेब काकडे यांनी वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपले आयुष्य खर्ची केले. वंचित घटकांना खरा शैक्षणिक न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा आधार बनले असे, प्रतिपादन प्रा. गणपत शेलार यांनी केले.

शेवगाव तालुक्‍यातील एफडीएल शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. आबासाहेब काकडे यांच्या 40 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते अध्यक्षयीय भाषण करताना बोलत होते. कार्यक्रमात विद्यालयाचे माजी लिपीक रामकृष्ण भिंगारे, प्रा. शशिकांत काकडे, ईश्वर वाबळे व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रा. सुरेश तेलोरे, रविंद्र कुटे, सहदेव साळवे, शितलकुमार गोरे, नितीन फोफसे, अमोल काटे, अलका भिसे, सुरेखा शेलार, रेखा आढाव, गोरक्षनाथ सातपुते, आदींसह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. दिपक बोडखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर, प्रा. सर्जेराव निकाळजे यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)