स्पर्धेच्या माध्यमातून संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न

प्राचार्या संगीता मिसाळ : न्यूरॉन स्कूलमध्ये विविध स्पर्धा

नगर – बालवयातच मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने बागड पट्टीतील न्यूरॉन प्री स्कूलच्या वतीने वर्षभर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. भारतीय सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करून त्यांना भारतीय संस्कृतीचे बाळकडू लहानपणापासूनच देण्याचा स्कूलचा प्रयत्न आहे. लहान मुलांवर बालपणातच चांगले संस्कार झाल्यास सक्षम पिढी निर्माण होण्यास मदत होते, असे प्रतिपादन प्राचार्या संगीता मिसाळ यांनी केले.

-Ads-

बागड पट्टीतील न्यूरॉन प्री स्कूलच्या वतीने फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण निधी सहाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्कूलच्या प्राचार्या संगीता मिसाळ बोलत होत्या. याप्रसंगी रणिता रच्चा, पूनम जग्गी, सीमा बायड, कविता शिंदे, स्वाती डोंगरे, दीपिका बुलाखे आदी उपस्थित होते.

स्कूलच्या वतीने दोन गटांत फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. यूकेजीसाठी सोलर सिस्टिम व एलकेजीसाठी ए टू झेड असा विषय होता. मुलांनी अतिशय आकर्षक अशा वेशभूषा परिधान केल्या. फॅन्सी ड्रेसच्या माध्यमातून मुलांपुढे नवीन विषय मांडून मुलांना त्या विषयाचे आकलन सोप्या पद्धतीने होते. नवनवीन विषय शिकण्याची त्यांना गोडी लागते. यासाठी आम्ही वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करतो. या स्पर्धेत शिवराज तांबोळी, बत्तूल शेख, मुल्ला हजला, आराध्ये न्यालपेल्ली, ध्रुव जाजू, इजान बागवान, मेहविश शेख, शिरीषा शेकटकर, अंश बेलीटकर, यूग सोनी, शिवान्या साळुंके, अहमद शेख, विराज शिंदे यांनी यश मिळविले, असे त्यांनी सांगितले.

निधी सहाणी म्हणाल्या की, ही मुले लहान असून देखील त्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली कला सादर केली. अशा स्पर्धांची गरज असते. मुलांची स्टेज डेअरिंग त्यामुळे वाढते. मुलांच्या गुणांना वाव देण्यासाठी स्कूलचे सुरू असलेले प्रयतक्‍ वाखाणण्याजोगे आहेत, असे त्यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)