माहिती,तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्याला संगणकीय ज्ञानाची गरज

आ. संग्राम जगताप : भोसले आखाडा येथील जिजामाता शाळेस 3 संगणक

नगर – सध्याचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. यासाठी बालवयातच विद्यार्थ्याला शिक्षणाबरोबरच संगणकाच्या ज्ञानाची जोड दिल्यास आजची पिढी ही भविष्याची सक्षम पिढी निर्माण होईल. खाजगी शाळांच्या तुलनेत मनपा शाळांना सुविधा अपुर्या आहेत. या ठिकाणी सर्वसामान्य पालकांचे विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना संगणकाचे ज्ञान व्हावे, यासाठी 3 संगणक देण्यात आले आहेत.

-Ads-

या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल, तर संगणकीय ज्ञान आवश्‍यक आहे. डिजिटल क्रांतीने जगभरातील शिक्षणाचे सारे संदर्भ बदलेले गेले. इंटरनेट व डिजिटल क्‍लास सुरू झाल्याने शाळेची प्रतिमा उंचावली. अध्यायन, व्यवस्थापन व समन्वय यातून मुलांचे शिक्षण गतिमान व अर्थपूर्ण होत आहे. पाठ्यपुस्तकातील धडे व कवितांचा आशय समजावून घेताना डिजिटल युगाची गरज भासते, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

नगरसेवक गणेश भोसले यांच्या प्रयत्नातून व आ. संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकासनिधीतून भोसले आखाडा येथील जिजामाता प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 3 संगणकाचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी यशवंत भांबळ, विराज भोसले, विजय फुलसौंदर, मुख्याध्यापक आर. व्ही. शिदोरे, मुख्याध्यापिका एस. एच. लोंढे, जी. एल. मंडलिक, एन. पी. कावरे, वाय. एन. आंधळे, ए. ए. तेलोरे, एस. के. पवार, पी. एस. सोनवणी, एम. व्ही. कोतकर, आर. व्ही. शिदोरे, एस. एम. कुमावत, विजय काटकर आदी उपस्थित होते.

नगरसेवक गणेश भोसले म्हणाले की, भोसले आखाडा परिसरातील जिजामाता प्राथमिक शाळेने चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचा चांगला प्रयत्न करीत आहे. या परिसरातील सर्वसामान्य जनतेचे विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. माझ्या मुलांनीही या शाळेमध्ये शिक्षण घेतले आहे. जिजामाता शाळा सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्याचे काम या शाळेतील शिक्षक करीत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे, यासाठी आ. संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्यांनी लगेच 3 संगणक देण्याचे कबूल केले. विद्यार्थ्यांनी चांगल्या व्यक्तीचा आदर्श घेऊन आपली वाटचाल करावी, असे सांगितले.

मुख्या. आर. व्ही. शिदोरे म्हणाले की, संगणकामुळे अध्ययन व अध्यापकाने कार्य सुकर होते. या संगणकाच्या माध्यमातून मनोरंजन, खेळ, स्वाध्याय, चाचण्या शिकवण्यास मदत होते. ते विद्यार्थ्याला आकलन होते. संगणकामुळे निरनिराळ्या विषयाची गोडी निर्माण होते. आ. संग्राम जगताप यांनी विद्यार्थ्यांसाठी 3 संगणक दिल्याबद्दल आभार मानतो.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)