‘न्युरॉन प्री स्कूलच्या’ बाळगोपाळांनी लुटला दहिहंडीचा आनंद

नगर – लहान वयातच मुलांना भारतीय सण, उत्सवांबद्दल माहिती व्हावी. या उद्देशाने सर्जेपुरा येथील न्युरॉन प्री स्कूलच्या वतीने नियमितपणे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. स्कूलमधील बालचमूंनी आकर्षक वेशभूषा परिधान करीत श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा साजरा करून दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी संचालिका प्राचार्या डॉ. संगीता मिसाळ, शिक्षिका रणिता रच्चा, पूनम जग्गी, सीमा बायड, स्वाती डोंगरे, सविता शिंदे, यास्मीन शेख आदी उपस्थित होते.

मुलांनी श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान केली होती, तर मुलींनी राधेची आकर्षक वेशभूषा परिधान केली होती. प्राचार्या डॉ. संगीता मिसाळ यांनी मुलांना सणाविषयी माहिती दिली. श्रीकृष्ण-राधेच्या कथा सांगितल्या. मुलांनी विविध धार्मिक गीतांवर नृत्य सादर केले. भगवद्‌गीतेचेही महत्त्व मुलांना समजावून सांगण्यात आले.प्राचार्या डॉ. संगीता मिसाळ म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने न्युरॉन प्री स्कूलने नेहमीच प्रयत्न केले आहेत.

बालवयातच मुलांवर योग्य संस्कार येथे केले जातात. प्रत्येक गोष्टीबद्दल बारीक सारीक माहिती त्यांना दिली जाते. सण, उत्सव, परंपरा काय आहेत, हे सण उत्सव कशासाठी साजरे केले जातात, याबद्दल माहिती देऊन त्यांना सहभागी करून घेत आम्ही हे सण उत्सव साजरे करतो. या निमित्त मुलेही आकर्षक वेशभूषा परिधान करून येतात, तसेच आपली कला सादर करतात. लहान वयातच चांगले संस्कार व्हावेत, चांगली व संस्कारक्षम पिढी घडावीत, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)