सावरगावतळ पेपरलेस ग्रामपंचायत

संगमनेर – तालुक्‍यातील सावरगावतळ ग्रामपंचायतीने दैनंदिन कामकाजामध्ये ई – ग्राम सॉफ्ट प्रणालीचा प्रभावी वापर करत तालुक्‍यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा बहुमान पटकावला आहे. यापुढे सर्व नोंदी व 33 प्रकारचे दाखले ग्रामस्थांना ऑनलाईन मिळणार असल्याने ग्रामपंचायत कारभार आणखी पारदर्शक व स्वच्छ होणार आहे.

या योजनेचा शुभारंभ सभापती निशा कोकणे यांच्या हस्ते करण्यात आला. या ग्रामपंचायतीने आपले सरकार योजनेतील ई – ग्राम सॉफ्ट संगणक प्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्यास सुरवात केली आहे. या माध्यमातून 33 प्रकारचे विविध दाखले ग्रामपंचायतीमधून ऑनलाईन मिळणार आहेत. आर्थिक व्यवहार, तसेच विविध प्रकारच्या नोंदी संगणकावर केल्या जाणार आहेत. ग्रामपंचायत कारभार आणखी पारदर्शक व स्वच्छ होणार आहे. ग्रामस्थांना जलद व गतीमान सेवा मिळणार असल्याने लोकाचा श्रम व वेळ वाचणार आहे.

“ग्रामस्थांना जलद व गतिमान सेवा मिळणार असल्याने लोकांचा वेळ व श्रम वाचणार आहे. तालुक्‍यातील ग्रामपंचायतींचे दप्तर ऑनलाईन करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच पेपरलेस होणार आहे.
– सुरेश शिंदे, गटाविकास अधिकारी, संगमनेर.

ग्रामपंचायत पेपरलेस होण्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सरकार सेवा केंद्र समन्वयक राहुल वाळके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच निहाबाई गाडे, उपसरपंच शिवनाथ नेहे, पोलीस पाटील गोरक्ष नेहे, गणेश नेहे, परशराम नेहे. सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)