संजीव भोर यांची अटक व सुटका

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

नगर – मराठा आरक्षण व इतर मागण्यांसदर्भात सोमवारी (दि.26) मुंबईत विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांना अटक केली. न्यायालयात त्यांना हजर केले असता हमीपत्र घेऊन त्यांची न्यायालयाने सुटका केली.

-Ads-

तोफखाना पोलीसांनी भोर यांना त्यांच्या घरून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली. भोर यांना रविवारी दुपारी बारा वाजता जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. मराठा आरक्षण व इतर वीस मागण्यांबाबत विधानभवनावर 26 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्याचा समन्वय समितीने निर्णय घेतला आहे.

या मोर्चाबाबत समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने भोर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाभरात संवाद यात्रा काढली होती. या यात्रेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भोर यांना शनिवारीच अटक केली होती.

दुपारी 12 वाजता त्यांना न्यायालयात त्यांना हजर केले. यावेळी त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन न्यायालयाने त्यांची सुटका केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)