प्रवरा नदी पात्रात बुडून तीन बालकांचा मृत्यू

संगमनेर : प्रवरा नदीपात्रात तीन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील मंगळापूर शिवारात आज सकाळाच्या सुमारास घडली. समर्थ दीपक वाळे (वय 10), रोहित चंद्रकांत वैराळ (वय 11), वेदांत ऊर्फ बाळा विनोद वैराळ (वय 9, तिघेही रा. मंगळापूर, ता. संगमनेर) असे मृत बालकांची नावे आहेत.

दरम्यान, सकाळच्या वेळी तिघेही बालके अंघोळीसाठी नदीपात्राकडे गेले होते. सध्या प्रवरेला शेतीसाठीचे आवर्तन सुरु आहे. त्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढले आहे. अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असता तिघेही नदीपात्रात बुडाले. नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला. मात्र त्यापूर्वीच तिघेही बुडाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरडाओरड झाल्यानंतर जवळपास असलेल्या युवकांनी नदीपात्राकडे धाव घेत तिघांनाही बाहेर काढले. त्यांना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)