संगमनेर – गणेशोत्सवा दरम्यान सार्वजनिक मंडळांनी डिजेवीरहित व प्रदूषण मुक्‍त उत्सव साजरे करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, डिजेचा आवाजाची मर्यादा न पाळणार मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी दिली.

घारगाव येथे घारगाव पोलीस दुरक्षेत्राच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळाची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी परिसरातील सरपंच, पोलीस पाटील, डीजे मालक, गणेशोत्सव मंडळ सदस्य, पोलीस ठाण्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशविसर्जन मिरवणूक रात्री दहाच्या आत संपवावी, तसेच गणेशोत्सव काळात मंडळांनी वर्गणीसाठी कोणालाही सक्‍ती करू नये व सजावट, रोषणाई यावरील अतिरिक्‍त खर्च टाळून आर्थिक मदत करून सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन भुसारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)