चोरीतील 25 दुचाकी, एक पिकअप, ट्रक जप्त

संगमनेर शहर पोलिसांची कारवाई : 20 लाखांचा मुद्देमाल पकडला

संगमनेर – वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या विशेष पथकाने तीन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून 25 दुचाकी, एक ट्रक, एक पिकअप जप्त केली आहे.

सागर गुरुमुखदास जिवनानी उर्फ सनी आहुजा (वय 24 ह. रा. मुसळगाव ता. सिन्नर जि. नाशिक, मूळ रा. आदर्शनगर ता. श्रीरामपूर, अल्ताफ युसुफ शेख (वय 21, रा. धावडे वस्ती, भोसरी, जि. पुणे, हल्ली रा. कुरणरोड, ता. संगमनेर), सचिन लक्ष्मण गोसावी (वय 21 रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरील आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अधिक तपास केला असता त्यांच्याकडून 25 दुचाकी, एक महिंद्रा पिकअप व एक दहा चाकी मालवाहतूक ट्रक असा एकूण सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात दिली.

पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोउप.नि. पंकज निकम यांच्यासह पो.कॉ. विजय खंडीझोड, रमेश लबडे, विजय पवार, राजेंद्र घोलप, सागर धुमाळ, सागर बोडके, अमृत आढाव, साईनाथ तळेकर यांच्या विशेष पथकाने वरील मुद्देमाल हस्तगत केला.

न्यायालयाने यातील आरोपी सागर जीवनानी याला दि.18 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपासादरम्यान अन्य गुन्हाचा उलगडा होण्याची शक्‍यता उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी व्यक्‍त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)