गणेश विसर्जन मिरवणूक कॉंक्रिटीकरणास विलंब

भाजपकडून संगमनेर नगरपालिका प्रशासनाचा निषेध : ठराव होऊनही दुर्लक्ष

संगमनेर – गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाचे कॉंक्रिटीकरण करण्याचा ठराव नगरपालिकेने बऱ्याच महिन्यांपूर्वी मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी न केल्याबद्दल संगमनेर भाजपने निषेध केला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गातील खड्डे कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी सदर मार्गाचे कॉंक्रिटीकरण करण्याचा ठराव नगरपालिकेने 10 महिन्यांपूर्वीच मंजूर केला होता. परंतु 2018 चा गणेशोत्सव अगदी जवळ येऊनही सदर कामास अद्यापही सुरुवात झालेली नाही.

नगरपालिकेने या कामाची निविदा काढण्यात केलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे यंदाही गणेशोत्सवाची मिरवणूक खड्ड्यांमधूनच निघावी, अशी नगरपालिकेची इच्छा आहे, असे सर्व गणेशभक्‍तांनी समजावे का? असा सवाल संगमनेर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी सचिन बांगर यांना भेटून विचारला. मुख्याधिकारी यांनी या कामास प्रशासकीय मान्यता उशिरा मिळाल्याचे सांगितले. त्यास प्रत्युत्तर विचारत ही मान्यता लवकर का मिळविली नाही? असा प्रतिप्रश्‍न उपस्थित करण्यात आला.

मुख्याधिकाऱ्यांनी डांबर व खडीचे पॅच मारून रस्ता खड्डेमुक्‍त करू, असे सांगितले. परंतु सध्या चालू असलेला पावसाळा लक्षात घेता, आता हे काम दर्जेदार होणे शक्‍य दिसत नाही. घाईगर्दीत काम उरकले तर चालू पावसामुळे दर्जा राखणे शक्‍यच होणार नाही. तरी नगरपालिकेने योग्य त्या तांत्रिक उपाययोजना करून गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग खड्डेमुक्‍त करावा, अन्यथा नाइलाजाने आपल्याविरुद्ध वरिष्ठस्तरावर तक्रार करावी लागेल, असे लेखी निवेदन यावेळी देण्यात आले.
या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राम जाजू, शहर सरचिटणीस दिनेश सोमाणी व सुदाम ओझा, शिरीष मुळे, सीताराम मोहरीकर, दीपक भगत, दीपेश ताटकर, दिलीप रावल, किशोर गुप्ता, शिवकुमार भांगीरे, भारत गवळी, जग्गू शिंदे, राहुल भोईर, सुनील खरे उपस्थित होते.

“या रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली.त्यासंदर्भात निविदा मागवून टेंडर देण्यात आले आहे. परंतु पावसामुळे लगेचच काम सुरू करून गणेश उत्सवापूर्वी पूर्ण होणे शक्‍य नाही. त्यामुळे सध्या डांबराच्या सहाय्याने रस्त्याची डागडुजी करून रस्ता सुरळीत करण्याचे काम पुढील दोन दिवसांत सुरू होईल.
-डॉ. सचिन बांगर, मुख्याधिकारी, संगमनेर नगरपालिका


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)