अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस दहा वर्षांची कैद

संगमनेर – दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला मोटारसायकलवरून पळवून नेत तिच्यावर दोन दिवस अत्याचार करणाऱ्या आरोपीला पॉस्को कायद्यांतर्गत संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षांची कैद सुनावली तर त्याचा साथीदार असलेल्या दुसऱ्या आरोपीला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. भरत काळू दुटे आणि सागर बहिरू साबळे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

अकोले तालुक्‍यातील पाडोशी येथे दोन वर्षांपूर्वी दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला आरोपी भरत दुटे याने पळून जाऊन लग्न करण्याचा आग्रह धरला होता. मात्र संबधित मुलीचा याला विरोध होता. 11 डिसेंबर 2016 रोजी ही मुलगी गावातील घराजवळच असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानात मोबाइलला बॅलन्स टाकण्यासाठी गेली असता तेथे आलेल्या भरतने तिला मला तुझ्याशी बोलायचे आहे, थोडे बाजूला चल, असे सांगितले. त्यावेळी ही मुलगी त्याच्यासोबत अंगणवाडीजवळ गेली असता तेथे आधीपासूनच सागर साबळे थांबलेला होता.

दुटे याने तिच्या तोंडाला रुमाल बांधत ओरडू नको, नाहीतर मारेल, असा दम देत साबळे याच्या मोटारसायकलवर बसवले आणि तिघेही केळी रुम्हणवाडी रस्त्याला असलेल्या जंगलात गेले. तेथून साबळे परत गावात परतला, तर दुटे मुलीसोबतच थांबला. रात्रीची वेळ झाल्याने दोघेही तेथेच झोपले. रात्री दुटे याने तिच्याशी लगट करत शरीरसंबंध प्रस्थापित केले.

दुसऱ्या दिवशी पहाटे तेथे आलेल्या साबळेच्या मोटारसायकलवरून तिला राजूर येथे नेले. तेथे दुटे याच्या ओळखीच्या मित्राच्या घरी जेवण केल्यानंतर रात्री पुन्हा पाडोशी येथे दुटे याच्या मामाच्या शेतात नेले. मध्यरात्री पुन्हा दुटे याने तिच्यावर अत्याचार केले. पहाटे कोणाला काही सांगू नकोस नाहीतर तुला मारून टाकील, अशी धमकी देत तो तेथून निघून गेला.

पहाटेच्या सुमारास संबंधित मुलीचा चुलत भाऊ तेथून जवळच तिला दिसल्याने तिने त्याला आवाज देत बोलावून घेत त्याच्यासोबत घरी गेली. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने तिने अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. उपनिरीक्षक रवींद्र बर्डे यांनी गुन्ह्याचा तपास केला. पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केली.

घटनेपासून आरोपी तुरुंगातच होते. यासंदर्भात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. जे. इनामदार यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारपक्षातर्फे ऍड. मच्छिंद्र गवते, संजय वाकचौरे यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)