वीजपंप चोरीचे संकट; दुष्काळात तेरावा महिना

File photo

संगमनेर – तालुक्‍यातील पठार भागात अपुऱ्या पावसाने शेती अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. पावसाळा संपतानाच विहिरी कोरड्या पडल्या आहेत. खरीप वाया गेल्याने आर्थिक अडचणीतील बळीराजा आगामी उन्हाळ्यात जनावरांना चारा व पिण्याचे पाणी कोठून आणावे, या विवंचनेत आहे.

दुष्काळामुळे उत्पन्न घटल्याने कुटुंबाच्या खर्चाचा मेळ घालताना गाव व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वीजपंप चोरीचे नवे संकट उभे राहिले आहे. कोरड्या विहिरीतले वीजपंप चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असून दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

-Ads-

पठार भागात सर्वदूर दुष्काळाची छाया आहे. पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने यंदा कस नदी ही एकदाही न वाहिल्याने कोरडी आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे पिकांचा खर्चही वाया गेला. काही ठिकाणी बाजरी आली. मात्र कणसे आली नाही. त्यामुळे चारा म्हणून पीक कापावे लागले. विहिरींना पाणी उतरले नाही. त्यामुळे ऑक्‍टोंबर मध्येच विहिरी कोरड्याठाक झाल्या. विहिरी कोरड्या पडल्याने शेतकऱ्यांचे विहीर परिसरात जाणे-येणे काहीसे कमी झाले.

जून महिन्यात माळवाडी परिसरातील विहिरीतून नवी मोटार चोरीला गेली. त्याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस ठाण्यात बरेच हेलपाटे मारले, मात्र पोलीस त्याबाबत समाधाकरण उत्तर देत नाही. अध्यापही शोध लागला नाही.
-गणेश शेळके, शेतकरी

याचा फायदा भुरट्या चोरांनी घेतला. मागील पंधरवड्यात बोटा, आंबी-दुमाला, कुरकूटवाडी, केळेवाडी, अकलापूर परिसरातील विद्युत पंप चोरीला गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच ते दहा हजार रुपयांचा भुर्दंड बसला आहे. चोरीचा प्रकार लक्षात घेता शेतकऱ्यांनी कोरड्या विहीरीतून वीजपंप काढून ते घरात ठेवण्यास सुरुवात केली आहे.

याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रारी करूनही चोरांचा शोध लागत नसल्याने शेतकरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास धजावत नाही. घारगाव पोलिसांनी या प्रकरणी लक्ष घालून प्रलंबित गुन्ह्यातील विजपंप चोरांचा शोध घेण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)