वाळुंज पतसंस्थेच्या 15 संचालकांवर गुन्हा दाखल

70 लाख 72 हजार रुपयांच्या अपहाराचा ठपका : ठेवीदारांनी केले होते उपोषण

संगमनेर : संगमनेर तालुक्‍यातील पिंपळगावदेपा (खंडेरायवाडी) येथील कै. रावसाहेब वाळुंज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत 70 लाख 72 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकांसह 15 संचालकांच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेवीदारांनी उपोषण केल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खंडेरायवाडी येथील कै. रावसाहेब वाळुंज पतसंस्थेत 2012 ते 31 मार्च 2018 दरम्यानच्या काळात पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक यांच्यासह 15 संचालकांनी मासिक सभेच्या ठरावाच्या नोंदी, तसेच लेखापरीक्षण अहवालातील तोट्याची दखल न घेता संस्थेमार्फत कर्ज वाटप न करता ठेवी स्वीकारल्या. व्यवस्थापक विश्वनाथ उमाजी कचरे यांनी खोटे व बोगस विड्रॉल पावत्यावर पैसे काढून रकमेचा अपहार केला.

संस्थेत जमा होणारी रक्कम संस्थेच्या बॅंक खात्यामध्ये न भरता स्वतः वापरली. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक यांच्यासह संचालकांनी ठेवीदारांचे हितसंबंध जोपासण्याची जवाबदारी असताना जवाबदारी पार न पाडत संगनमताने अधिकाराचा दुरुपयोग करून संस्थेमध्ये आर्थिक अपहार केला, असे सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक विक्रम वामन घुले यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

गुरुवारी (दि.25)सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक विक्रम वामन घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण सदाशिव वाळुंज, भाऊसाहेब बबन ढेरंगे, हौशीराम अनाजी ढेरंगे, बाबासाहेब आनंदा तळेकर, रामदास लहानू ढेरंगे, मधुकर भावका वाळुंज, देवजी उमा काळे, हरिचंद्र लहानू ढेरंगे, गंगाधर भावका आगलावे, विठ्ठल रोडीबा वाळुंज, कैलास पंढरीनाथ वाकचौरे, दत्तात्रय रघुनाथ वाळुंज, गणपत धोंडीबा ढेरंगे, लक्ष्मण अण्णा वाळुंज, राहुल गोरक्ष वाकचौरे, सुमन कारभारी ढेरंगे, मनीषा रामनाथ चाचण, विश्वनाथ उमाजी कचरे (सर्व रा. खंडेरायवाडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी, मजुरांपासून दुकानदारापर्यंत अनेक व्यवसायिक, ज्येष्ठ नागरिकांनी कवडी कवडी करुन हे पैसे जमवले होते. मात्र मुदत संपूनही हे पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर तीन दिवस उपोषण केले होते. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन उपनिबंधकांनी दिल्यानंतर ठेवीदारांनी उपोषण मागे घेतले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)