जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय अन्यायकारक : आ. तांबे

संगमनेर – अकोले, संगमनेर तालुक्‍यांमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे. सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही सरकारने जायकवाडीत पाणी सोडण्याचा घेतलेला निर्णय एकतर्फी व येथील जनतेवर अन्यायकारक असल्याचे मत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना आमदार डॉ. तांबे म्हणाले, नगर जिल्हा हा कमी पावसाचा जिल्हा आहे. त्यात संगमनेर तालुका पर्जन्यछायेखालील प्रदेश असून, येथे कायमच कमी पाऊस पडतो. या भागातील दुष्काळग्रस्तांना कायमचा दिलासा देण्यासाठी इंग्रजांनी भंडारदरा धरणाची निर्मिती केली. उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाची निर्मिती केली. यावर्षी उत्तर नगर जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस पडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समन्यायी पाणी वाटप कायद्याविरोधात थोरात कारखाना व हरिश्‍चंद्र फेडरेशन यांनी कोर्टात दाद मागितली, तरी ही शासनाने अन्यायकारक निर्णय घेत प्रवरा खोऱ्यातून 3.85 टीएमसी पाणी सोडण्यास प्रारंभ केला. हा निर्णय अत्यंत चुकीचा असून, येथील शेतकरी व सर्वसामान्य जनता उद्‌ध्वस्त करणारा आहे.

शासनाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय उत्तर नगर जिल्ह्यासह नाशिकमधील दुष्काळी परिस्थिती पाहून तातडीने मागे घ्यावा, अन्यथा मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा आमदार तांबे व प्रवरा उपखोरे पाणी बचाव संघर्ष समितीने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)