ऑक्‍टोबर हिटमुळे जनावरेही सावलीच्या शोधात

संगमनेर – हिवाळ्यातील गुलाबी थंडी सुरू होण्याअगोदरच ऑक्‍टोबर हीटने अंगाची काहिली होत आहे. चाऱ्यासाठी भटकंती करत जनावरे देखील झाडांच्या सावलीत आधार घेऊन विश्रांती घेत असलेच्या चित्र संगमनेर तालुक्‍यातील कौठे मलकापूर परिसरात पाहायला मिळत आहे.

संगमनेर तालुक्‍यातील दरेवाडी, बिरेवाडी, पिंपळगाव देपा, वरवंडी परिसरात यंदाच्या वर्षी पाऊस रिमझिम स्वरुपात पडला. समाधानकारक पाऊसच नसल्याने उन्हाचा कडाका अधूनमधून जाणवत आहे. पाऊस नसल्याने डोंगरावरही चारा नाही. तसेच जनावरांचा चारा-पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भर उन्हात चारा व पाण्याच्या शोधात वणवण भटकंती करत असलेल्या मेंढ्यांचे कळप उन्हापासून बचाव करण्यासाठी दिसेल तेथील झाडांच्या सावलीखाली विश्रांती घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)