जानेवारीत ऊस भावासाठी निघणार पहिला मोर्चा

खा. राजू शेट्टींचा इशारा : स्वाभिमानाने जागा मिळाल्यावरच कॉंग्रेसबरोबर आघाडी

संगमनेर – जागा वाटपाच्या चर्चेत आम्हाला स्वाभिमानाने जागा मिळाल्या, तर आम्ही कॉंग्रेस बरोबर, नाही तर राजकारण काही आमचा धंदा नाही. राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी एफआरपी थकवली, त्यांच्या विरोधात पहिला मोर्चा 1 जानेवारी पासून कोल्हापूरच्या प्रादेशिक साखर संचालकांच्या कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संगमनेर तालुक्‍यातील पिंपरणे येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात खा. शेट्टी बोलत होते. यावेळी शेतकरी नेते दशरत सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, भास्कर दिघे, सुधाकर रोहम, शरद थोरात, चंद्रकांत घुले, दीपक वाळे, साहेबराव नवले, सुरेश वाघ आदी उपस्थित होते.

खा. शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या मनाची मशागत करण्यासाठी हा मेळावा आहे. साखर कारखानदारांनी अनुदानासाठी सरकारकडे जाऊन बसावे. कारण ऊस दर नियंत्रण 1966 नुसार शेतकऱ्यांची एफआरपी देणे साखर कारखानदारांना बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत साखरेला भाव नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे देत नसले, तर आधी सरकारचा कर आणि व्याजाचे हप्ते थांबून शेतकऱ्यांचे पैसे साखर कारखानदारांनी द्यावेत.

कॉंग्रेसने तुम्हाला फसवले. मी तुमच्या शेतीमालाला भाव मिळून देतो, असे म्हणत प्रचार केला तेव्हा मोदी सत्तेत आले. हमीभावाला सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. दुसरीकडे तीन वर्षांच्या फरकासहित सातवा आयोग देताय. उत्पादन वाढवून कांद्याचे काय झाले, बघितले. दोन टन कमी पिकवा आणि विकायला शिका. पहिली नजर शिवारात, दुसरी नजर बाजारात आणि तिसरी नजर राजकारणात ठेवायचा सल्ला त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)