‘राजहंस’तर्फे दिवाळीनिमित्त 25 कोटी बॅंकेत वर्ग

दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिहं देशमुख यांची माहिती

संगमनेर – संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने दीपावलीनिमित्त दूध खरेदी दर फरक, दूध पेमेंट, वाहतूक ठेकेदारांची अनामत, पेमेंट, कामगारांचा पगार व बोनस आदीपोटी 25 कोटी रुपये बॅंकेत वर्ग केल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली.

देशमुख म्हणाले, दुग्धव्यवसायामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक समृद्धी आणली आहे. तालुक्‍यात निकोप व स्वच्छ सहकाराचे जाळे आहे. सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या समृद्धीसाठी संघ अविरतपणे काम करत असताना ग्राहकांना स्वच्छ व निर्भेळ दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरणही करण्यात येते.

दीपावली सणानिमीत्त दूध उत्पादक, दूध वाहतूक ठेकेदार व कामगारांना भरीव रक्कम वाटप केली आहे. दूध उत्पादक सभासदांचे साततत्याने हित जोपासताना त्यांच्या फायद्याचे ठरतील असेच निर्णय माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने घेतले आहेत.

गतवर्षी संघाने प्रतिदिनी सुमारे 3.23 लाख लिटर दूध संकलित केल्याचे संघाचे ज्येष्ठ संचालक व जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष बाजीराव पा. खेमनर यांनी दिली. दूध संघाची मागील वर्षीची उलाढाल 416 कोटी रुपयांची झाली. संघामार्फत मूरघासासाठी बॅगा, सामूहिक जंत व गोचीड निर्मूलन, कावीळ लसीकरण, मका बियाणे, मिल्कींग मशीन इत्यादींचे वाटप, तसेच मुक्त संचार गोठा, मॉर्डन डेअरी फार्म इत्यादी योजना राबविण्यात येत असल्याची माहिती उपाध्यक्ष साहेबराव गडाख, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे व जनरल मॅनेजर गणपतराव शिंदे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)