संगमनेरमध्ये आ. कदमांच्या पुतळ्याला ‘चपला मारो’ आंदोलन

संगमनेर – भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींविषयी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ गुरुवारी संगमनेर शहरात महिला कॉंग्रेसच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपला मारो आंदोलन करून काळे फासले. सरकार व महिला आयोग गप्प का? असा सवाल नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केले.

बसस्थानकासमोर तांबे यांच्या नेतृत्वाखाली महिला कॉंग्रेस समितीच्या वतीने निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभापती निशाताई कोकणे, अर्चना बालोडे, अॅड. रंजना गंवादे, अॅड. निशाताई शिवुरकर, अॅड. ज्योती मालपाणी आदिंसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

तांबे म्हणाल्या, सत्ताधारी आमदाराने महिलांबद्दल असे बोलणे हे निंदणीय आहे. भाजप सरकारच्या काळात स्त्रीया ह्या असुरक्षित झाल्या आहे. सर्वत्र बेबंदशाही वाढली आहे. आ. कदम यांचे वक्‍तव्य हे अपप्रवृत्तींना बळकटी देणारे आहे. त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. छिंदम, परिचारक, कदम यांच्या अशोभनीय वक्‍तव्यावर सरकार गप्प बसून पाहत आहे. राज्य सरकार, महिला आयोग अशा वेळी गप्प का? पुरोगामी महाराष्ट्रात स्त्रीयांना तिच्या अस्तित्वासाठी लढावे लागते ही बाब अतिशय खेदजन असून आ.राम कदम यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

यावेळी अनुराधा आहेर, रेणुका गुंजाळ, सुनंदा दिघे, अर्चना बालोडे, डॉ.दिपाली पानसरे यांनीही मनोगत व्यक्‍त केले. यावेळी प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवती, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संगमनेर शहर तालुका शिवसेना युवासेना व महिला आघाडी शिवसेना यांच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी सुभांगी नांदगावकर यांनी निषेध नोंदवत आ. कदम यांची पोलीस सुरक्षा काढून घेण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, युवासेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, महिला आघाडी तालुकाप्रमुख शीतल हासे, सुरेखा गुंजाळ, संगीता गायकवाड, उपशहर प्रमुख पप्पू कानकाटे, इम्तियाज शेख, नगरसेवक लखन घोरपडे, पंचायत सदस्य अशोक सातपुते, आदीसह शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)