शेतीमाल हमीभावाने खरेदी करणे सरकारची जबाबदरी – घनवट

श्रीगोंदा – शासनाने हमीभाव जाहीर केल्यास शेतमालाच्या खुल्या बाजारातील किमती आधारभुत किमतीपेक्षा कमी होऊ नयेत व घसरल्यास तो माल आधारभुत किमतीत खरेदी करण्याची जबाबदारी शासनाचीच आहे, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी व्यक्‍त केले.

घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या दोन तीन वर्षात सर्वच प्रमाणित पिकांचे भाव आधारभुत किमतीच्या खाली आहेत. सरकार खरेदी करू शकत नाही म्हणुन नाईलाजाने शेतकरी कमी दरात व्यापाऱ्यांना विकतो. व्यापारी, खुल्या बाजारात ज्या किमती असतील. त्यानुसार परवडेल अशा भावात खरेदी करतो. गेल्या साठ वर्षापासुन किमान आधारभुत किमतीचा कायदा अस्तित्वात आहे. इतकी विदारक परिस्थिती कधी निर्माण झाली नव्हती. सरकारने केलेल्या कडधान्याच्या बेसुमार आयाती, साठ्यांवरील बंधणे, निर्यात बंदीमुळे या तीन वर्षात हा पेच निर्माण झाला आहे. आधारभुत किमतीच्यावर कडधान्याचे दर रहातील. यासाठी काही करण्यापेक्षा ते पाडण्याचेच सरकार काम करत आहे.

खरिप हंगामातील कडधान्य बाजारात यायला सुरुवात झाली आहे, पण सरकारी खरेदी सुरू करण्याची कुठे हालचाल दिसत नाही.हेक्‍टरी किती माल खरेदी करायचा हे निश्‍चित व्हायचे आहे. मागील वर्षी खरेदी केलेल्या मालाने गोदामे गच्च भरलेली आहेत. मागील वर्षी विकलेल्या मालाचे पैसे अद्याप अनेक शेतकऱ्यांना सरकारने अदा केले नाहीत (48 तासात पैसे अदा करण्याचा नियम आहे.) शेतकरी कसा सरकारी यंत्रणेवर विसंबून राहणार?

शेतमालाच्या किमती आधारभुत किमतीच्या खाली पडल्यास सरकारने इतकी तत्पर यंत्रणा राबवावी की व्यापाऱ्यांकडे जाण्याची वेळ येवूच नये. व्यापाऱ्यांना दोष देऊन काय फायदा. आधारभुत किमतीच्यावर भाव राहिल्यास व्यापारी खरेदी करतात. जर काही नैसर्गिक आपत्तीमुळे धान्य खराब झाले व बाजारात त्याला ग्राहक नसेल तर तो माल सरकारने खरेदी करावा, अन्यथा शेतीमाल व्यापारातील सरकारी हस्तक्षेप कायमस्वरुपी बंद करावा, अशी मागणी घनवट यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)