संगमनेर – माहुरी येथील घोडेकर दांपत्याने स्वत:चा मुलगा संभाळ करीत नसल्याची फिर्याद दाखल केली आहे. धक्काबुक्की करीत घराबाहेर काढल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गणपत भाऊराव घोडेकर (वय-80) व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई ( वय-75 ) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मुलगा संदीप (वय-40) हा आमचा सांभाळ करीत नाही. तो माझ्या नावावरील जमीन गेल्या 15 वर्षांपासून कसतो आहे. त्याचे उत्पन्न घेतो आहे. तसेच त्याने आमच्याकडे असलेले 33 लाख रुपये धाक दाखवून बॅंकेतून काढून घेतले. आमच्या औषधोपचाराचा खर्चही तो करीत नाही. तो आम्हाला जेवण देत नाही. घरात कोंडून ठेवतो, असे तक्रारी या दांपत्याने केल्या आहेत. 26 ऑगस्ट रोजी त्याने आम्हास मारहाण केली. धक्काबुक्की व शिवीगाळ करीत घराबाहेर काढले. जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आम्हाला आता आमच्या मुलींकडे राहावे लागत आहे, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

त्यांच्या तक्रारीनुुसार संदीपच्या विरोधात आईवडीलांना मारहाण, छळ, उपाशीपोटी ठेवणे, सांभाळ न करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)