संगमनेरात पाच जणांविरोधात ॲट्रॉसिटी

संगमनेर – तालुक्‍यातील साकुर येथील एका कुटुंबास जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केलेल्या आरोपावरून पाच जणांविरोधात ॲट्रॉसिटीअंतर्गत घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी सांगितले.

घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साकुर येथे सुभाष भिमाजी सोनवणे यांचे शेतात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास विटांचे कच्चे तुकडे, दादा अब्दुल पटेल, रुस्तम अब्दुल पटेल, वसीम दादा पटेल, इस्माईल रुस्तम पटेल व उस्मान अहमद पठाण हे टाकत होते. तेव्हा सोनवणे व त्यांच्या कुटुंबीयांनी तेथे जात हे विटांचे तुकडे टाकण्यास विरोध केला, यावेळी संबंधितांनी सोनवणे त्यांची पत्नी व मुलगा यांस धक्काबुक्की करून जातीवाचक शिवीगाळ केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, सुभाष सोनवणे (वय 49), (रा. साकुर) यांनी याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या संबंधित पाच जणांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)