लाचखोर तलाठ्याला 5 वर्षांची शिक्षा

सात बारा उताऱ्यावर विहिरींची नोंद घेण्यासाठी मागितली होती लाच

लाचेच्या नोटांना अँथ्रोसीन पावडर

या प्रकरणात आरोपी कामगार तलाठी यांना दिलेल्या लाचेच्या रकमेतील नोटांना अँथ्रोसीन पावडर लावले गेले होते. आरोपीच्या हाताचे व बोटांचे ठसे त्या नोटांवर मिळून आले. त्याचबरोबर न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा, मुंबई येथील अधिकारी साक्षिदार क्र. 4 यशवंत नामदेव वाघमारे यांनी आरोपीचे फोवरील संभाषण खरे असल्याचे न्यायालयासमोर मांडले. त्यामुळे देखील हा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला.

संगमनेर – सात बारा उताऱ्यावर विहिरीची नोंद ओढण्यासाठी कामगार तलाठ्याने पंधरा हजारांची लाच स्विकारल्याप्रकरणी संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी कामगार तलाठ्यास 5 वर्षाची शिक्षा सुनावल्याचा निकाल शुक्रवारी (दि.7) रोजी दिला.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तम निवृत्ती दळवी असे यातील शिक्षा सुनावण्यात आलेल्या कामगार तलाठ्याने नाव आहे. लहानू लक्ष्मण आभाळे ( रा. अकलापूर ता. संगमनेर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. 7 ऑगस्ट 2014 रोजी अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली होती. लहानू आभाळे यांनी अकलापूर गावातील भाऊबंदकीच्या वादातील वडिलोपार्जित जमिनीचा आठ आणे हिस्सा कोर्टामार्फत मिळवला होता.

न्यायालयाच्या निकालानुसार तलाठ्यांनी सात बारा उताऱ्यावर त्यांची नोंद देखील चढवली. परंतु त्यात विहिरीचा उल्लेख नसल्याने लहानू आभाळे यांनी कामगार तलाठी उत्तम दळवी यांना सदरील विहिरींची नोंद सात बाऱ्यावर घेण्याची विनंती केली. कामगार तलाठी दळवी यांनी याकामी त्यांच्याकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे आभाळे यांनी अहमदनगर लाच लुचपत विभागाला यासंबंधी तक्रार देऊन झालेल्या घटनेची माहिती दिली.

अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आभाळे यांनी लाचेच्या रकमेपैकी 15 हजार रुपये देण्याचे कामगार तलाठी दळवी यांना कबूल केले. त्यानुसार दि. 07 ऑगस्ट रोजी पंचांच्या समक्ष अकलापूर येथील तलाठी कार्यालयात सापळा रचून कामगार तलाठी उत्तम दळवी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.

साडे चार वर्ष चाललेल्या या खटल्यात न्यायालयाने शेवटी लाच लुचपत कायदा 1988 कलम 7 आणि 13 (1) (ड) सह 13 (2) अंतर्गत 5 वर्षांची शिक्षा व 20 हजार रुपये दंड असा निकाल सुनावण्यात आला आहे. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी सुनावणी केली. तर ऍड. बी. जी. कोल्हे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)