बेकायदेशीर वाळूसाठा प्रकरणी सव्वा कोटी दंडाची नोटीस

file photo

वाळूचा होणार पंचनामा

महसूल प्रशासन आवटे बंधूंच्या मालकीच्या गट क्र. 690/2 मध्ये 89 ब्रास वाळूचा लवकरच पंचनामा केला जाणार आहे. वाणी याबाबत मिळालेल्या नोटीसीला प्रांताधिकारी संगमनेर यांच्याकडे अपील करणार आहेत.

संगमनेर – तालुक्‍यातील येलखोपवाडी परिसरात बेकायदेशीर वाळूसाठा केल्या प्रकरणी तीन जणांवर संगमनेरचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या आदेशांव्ये सव्वा कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.

येलखोपवाडी शिवारात सुमन एकनाथ वाणी यांनी गट क्र. 127/2 मध्ये 233 ब्रास, गंगाराम कारभारी आवटे व प्रमोद कारभारी आवटे याच्या मालकीच्या गट क्र 690/2 मध्ये 89 ब्रास वाळूचे अनधिकृत उत्खनन करून बेकायदेशीररित्या साठा केल्याप्रकरणी 27 सप्टेंबर रोजी महसूल पथकाने पंचनामा केला होता. त्यासंदर्भात त्यांना महसूल प्रशासनाकडून नोटीस देऊन खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते.

याबाबत वाणी यांनी संबंधितांनी मंडळअधिकारी यांनी मोघम पंचनामा केला असून फेर पंचनामा करण्याचे 3 ऑक्‍टोबर रोजी सादर केलेल्या खुलाशात म्हटले होते. सुमन वाणी यांनी केलेल्या वाळूसाठ्याचे फेर पंचनामे केले असता त्यांच्याकडे 16 ब्रास वाळू आढळून आली. त्यानुसार वाणी यांनी 16 ब्रास वाळू दांगड यांच्याकडून खरेदी केल्याच्या पावत्या जोडून आपले म्हणणे मांडले. मात्र वाणी यांनी सदरचा पंचनामा मोघम असले बाबत म्हटले. परंतु याबाबत कोणताही पुरावा सादर केला केला नाही. याबाबत वरील तिघांना दंडात्मक कारवाई का करू नये, असे 6 ऑक्‍टोबरला नोटीस देऊन खुलासा विचारला होता.

मात्र त्यांनी खुलासा सदर न केल्याने 27 नोव्हेंबरला संगमनेरचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 166 चे कलम 48 (7) मधील तरतुदीनुसार सुमन वाणी यांना 89 लाख 29 हजार 420, आवटे बांधूना 35 लाख 64 हजार 60 रुपये असा एकूण सव्वा कोटी रुपयांचे नोटीस दिले आहे. सदर दंडाची रक्कम न भरल्यास तरतुदीनुसार वरील रक्कम वसूल केली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)