आदिवासी वसतिगृहाचा गृहपाल लाचलुचपतच्या जाळ्यात

30 हजारांची लाच स्वीकारताना पकडले

संगमनेर – घुलेवाडी ( ता.संगमनेर) येथील आदिवासी वसतिगृहाच्या गृहपालाने वसतिगृहाला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या कंत्रादाराकडून 65 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करत यातील लोकसेवकाला 30 हजारांची लाच स्वीकारताना पकडल्याची घटना आज (दि.28) घडली. सुधीर सोपान सांगळे (गृहपाल, आदिवासी वसतिगृह, घुलेवाडी, ता. संगमनेर) असे यात पकडण्यात आलेल्या लोकसेवक आरोपीचे नाव आहे.

-Ads-

घुलेवाडी येथील आदिवासी वसतिगृहाला टॅंकरने पाणी पुरविणाऱ्या कंत्राटदाराचे जुलै 2018 ते ऑक्‍टोबर 2018 चे एकूण बिल रुपये 99714/- मंजूर करवून त्याचा धनादेश काढल्याच्या मोबदल्यात 65 हजार रुपयांची मागणी गृहपाल सांगळे यांनी केली होती, याची माहिती कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिल्यानंतर ताबडतोब सापळा रचून लाचेची मागणी केलेल्या रकमेपैकी 30 हजार रुपये देण्याचे तक्रारदाराने कबुल केले.

वसतिगृहाच्या गेटजवळ लाचेचे पैसे स्वीकारताना आरोपी लोकसेवक सांगळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)