संगमनेर – भारतीय सैन्यदलातील वीर जवान केशव गोसावी हे नुकतेच दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. त्यांना संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज बांधवांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चाही करण्यात आली. अध्यक्षस्थानी विजय गिरी होते. यावेळी शहीद जवान केशव गोसावी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच केशव गोसावी अमर रहे, अमर रहे, अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शहीद गोसावी यांच्या वारसांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच समाजाने एकत्र येत संघटन मजबूत करणे, दर महिन्याला बैठक घेणे, तालुक्यातील गटात प्रतिनिधी नेमणे, समाजातील कुटुंबांचा सर्व्हे करणे, दफन भूमीची समस्या सोडवणे, समाजाची पतसंस्था स्थापन करणे, शहरातील म्हाळुंगी नदीजवळील दफन भूमीचा प्रश्न मार्गी लावणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवणे, शहरात कार्यालय सुरू करणे, आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी विजय गिरी, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब गंभिरे, पत्रकार पंढरीनाथ पुरी, किरण पुरी, दशरथ गोसावी, संतोष पुरी, अण्णासाहेब गोसावी, विश्वनाथ गोसावी, भागवत भारती, काशिनाथ गोसावी, बाबासाहेब गोसावी, शिवाजी गोसावी, शिवाजी गोसावी, बाळासाहेब गोसावी, चंद्रकांत गिरी, रणजित गिरी, डॉ. वरुण गिरी, मच्छिंद्र भारती, लक्ष्मण भारती, सोमनाथ गोसावी, उल्हास गोसावी, बबन पुरी, चंदन गोसावी, अर्जुन गोसावी, माधव पुरी, यमन गोसावी, पोपट गोसावी आदींसह समाजबांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन दशरथ गोसावी यांनी केले. प्रास्ताविक प्रदीप गोसावी यांनी, तर आभार संतोष पुरी यांनी मानले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा