वीज अभियंत्याला शिवीगाळ, गुन्हा दाखल

संगमनेर – महावितरणची वीज बिलाची थकबाकी वसुली सुरु असताना शहरातील नायकवाडपुरा भागातील एका इसमाने वीज पुरवठा खंडित करण्यासाठी खांबावर चढलेल्या कर्मचाऱ्याला व अभियंत्याला रोखत शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला.

याबाबत शहर पोलीस ठाण्यात महावितरणचे सहायक अभियंता विश्वजित विलासराव मोडक यांनी फिर्याद दाखल केली. समाद शेख (पूर्ण नाव माहीत नाही) असे यातील शिवीगाळ केलेल्या इसमाचे नाव आहे.

-Ads-

आज सकाळी मोडक व कर्मचारी योगेश दोडे हे वीज बिलाच्या थकबाकीदारांकडे वीज बिल भरण्याची मागणी करण्यासाठी गेले असता आरोपी समाद याने वीज बिल भरण्यास नकार दिला व वीज पुरवठा खंडित करण्यासाठी खांबावर चढलेल्या कर्मचाऱ्याला शिविगाळ करत वीज पुरवठा खंडित केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

त्याचबरोबर यातील सहाय्यक अभियंता मोडक यांची गाडी अडवून त्यांना धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी समाद शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)