संगमनेर – जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशानुसार जिल्हाभरात दंगल नियंत्रक पथकाकडून “मॉकड्रील’ करून घेण्यात येत आहे. जमावावर नियंत्रण मिळविण्याचे प्रात्यक्षिक करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सकाळी संगमनेरात पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून “मॉकड्रील’चे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

जमावाकडून हिंसक कृत्य घडल्यास दंगल नियंत्रक पथकाने करावयाच्या कारवायासंबंधीचे प्रात्यक्षिक या वेळी घेण्यात आले.
जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या सोडणे, हवेत गोळीबार अशा विविध प्रकारांचा यात समावेश होता.

या वेळी संगमनेर तालुका, आश्वी, घारगाव पोलीस ठाण्यांना आपत्कालीन संदेश देण्यात आले. त्याचबरोबर अग्निशमनदल व रुग्णवाहिकेलाही आपत्कालीन संदेश देऊन घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)