अध्यात्मातून वाढतो मानवता धर्म – आमदार थोरात

संगमनेर – वारकरी संप्रदाय जात, पात, धर्म मानत नाही. तो फक्त मानवता हा एकच धर्म मानतो. अध्यात्मातून आत्मशांती मिळत असून सुख व समाधान मिळविण्यासाठी अध्यात्म गरजेचे आहे. अध्यात्मातून माणवता धर्म वाढीस लागत असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर कारखाना कार्यस्थळावरील अमृतेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात झालेल्या संत जगतगुरू तुकाराम महाराज पारायण गाथा सप्ताहाच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते. या वेळी समवेत शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पा.खेमनर, कारखान्याचे अध्यक्ष ऍड. माधवराव कानवडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, रामदास वाघ, चंद्रकांत कडलग, नानासाहेब शिंदे, रावसाहेब वर्पे, मीनानाथ वर्पे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, ह.भ.प. चंद्रलेखाताई काकडे, ह.भ.प. गोविंद महाराज करंजकर, ह.भ.प. अरुण फरगडे, ह.भ.प.गावडे महाराज आदी उपस्थित होते. या वेळी ह.भ.प रामायणाचार्य माधव महाराज स्वामी (पंढरपूर) यांचे काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली.

या वेळी आ. थोरात म्हणाले, की भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली अध्यात्माची परंपरा वाढत आहे. ती आपण यापुढे सुरूही ठेवू. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी गीतेचे प्राकृत भाषेत जे विवेचन केले आहे, त्याचे पारायण करून जो आनंद आपल्याला मिळतो तो भाग्याचा आहे. वारकरी सांप्रदायाला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. मानवता धर्म वाढीस लावणारी वारकरी सांप्रदायाची ही शिकवण आहे. अनेक संत महात्म्यांनी जगाला मानवतेचा संदेश दिला आहे.

ज्ञानेश्‍वरी हा जगाचा आद्यग्रंथ आहे. अध्यात्मामुळे प्रत्येकाला आत्मशांती मिळते तसेच मैत्री व कौटुंबिक जिव्हाळा निर्माण होतो. येथील अमृतेश्‍वर मंदिर परिसर हा निसर्गाने सुंदर झालेला आहे. स्वच्छता व चांगल्या वातावरणामुळे हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान ठरत आहे. निसर्गाने डोंगर, दऱ्या, हवा, पाणी, फळे, फुले यांनी विविधता निर्माण केली आहे. ती जपा व आनंद घ्या. जीवनाचा खरा आनंद हा निसर्गात व मानवी प्रेमात आहे. भौतिक सुखाच्या मागे न धावता प्रत्येकाने आपल्या मुलांना चांगल्या शिक्षणाबरोबर अध्यात्मिक संस्कार द्या.

या वेळी रामनाथ शिंदे, केशव दिघे, कार्याध्यक्ष बाबासाहेब वर्पे, सचिव कारभारी शेणकर, खजिनदार विजय जगताप, किशोर देशमुख, किरण कानवडे, शरद गुंजाळ आदी उपस्थित होते.कार्यकारी संचालक जगन्नाथ घुरगरकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी भाविक व महिल्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)