भूकंपाची भीती मनातून काढून टाका

माजी मंत्री मधुकर पिचड : घारगाव परिसरातील गावांना भेट

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील घारगाव व बोटा परिसरात वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या सौम्य धक्‍क्‍याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ती भिती मनातून काढून टाकून लोकांनी घाबरून जाऊ नये, असा सल्ला माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी ग्रामस्थांना दिला.

घारगाव, बोटा, आंबी-खालसा, बोरबन, माहुली, माळेगाव पठार, खंदरमाळ, तांगडी, कौठे बु., अकलापूर आदी गावांना बसत असलेल्या सौम्य धक्‍क्‍याच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी घारगाव येथे भेट दिली. या बैठकीत उपस्थित नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. या वेळी नागरिकांनी या परिसरात बसणाऱ्या भूकंपाच्या सौम्य धक्‍क्‍याबाबत उपाययोजना होणे गरजेचे आहे. या परिसरात भूकंपमापक यंत्र बसवण्याची मागणी केली. त्यावर पिचड म्हणाले की, भूकंपाच्या भीतीने घाबरून जाऊ नका. या परिसरात भूकंपमापक यंत्र बसवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आवश्‍यकतेपर्यंत करीन, असे आश्‍वासन उपस्थितांना दिले.

या प्रसंगी तहसीलदार साहेबराव सोनवणे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, शिवसेना तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर, बबन गागरे, पंचायत समिती सदस्य प्रियांका गडगे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)