आंबीखालसा परिसरात बिबट्याचे दर्शन

संग्रहित छायाचित्र

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील आंबीखालसा परिसरातील गणपीरदरा रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला बिबट्याचे दर्शन घडले. बिबट्याला पाहून घाबरलेल्या महिलेने तेथून चारचाकीमध्ये जाणाऱ्या गावातील एका व्यक्‍तीच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी हॉर्न वाजवल्याने बिबट्याने धूम ठोकली.

आंबीखलासा शिवारातील रहिवाशी ज्ञानेश्‍वर चंद्रकांत कान्होरे हे आपल्या शेताकडे संध्याकाळी 6 वाजता चारचाकी वाहनाने जात होते. त्यावेळी त्याच्या वाहनाला निर्मला विठ्ठल गाडेकर ही महिला आडवी होऊन गाडेकर मळा येथे एक बिबट्या दबा धरून बसलेला आहे. मला तुमच्या वाहनात पुढे सोडा, असे सांगितले. तेव्हा कान्होरे यांनी त्या महिलेला आपल्या वाहनात घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बिबट्याच्या दिशेने वाहन घेऊन जात असताना गाडेकर मळा या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला कुत्र्याला पकडण्यासाठी बिबट्या दाबा धरून बसलेला होता. याचे व्हिडिओ चित्रिकरण करत कान्होरे यांनी गाडीचा हॉर्न वाजवल्याने बिबट्याने धूम ठोकली. यापूर्वी या परिसरात बिबट्याने अनेकांना दर्शन दिले आहे. या परिसरातील शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)